Home Breaking News वणी-मारेगाव रस्त्यावर भीषण अपघात

वणी-मारेगाव रस्त्यावर भीषण अपघात

● मारेगावचे सचिन देवाळकर जागीच ठार

C1 20260519

मारेगावचे सचिन देवाळकर जागीच ठार

SAD NEWS | वणी-मारेगाव रस्त्यावरील निंबाळा रोडवर दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात मारेगाव येथील 37 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवार, 19 मे रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान घडली. Terrible accident on Wani-Maregaon road

सचिन जगन देवाळकर (37) असे मृतकाचे नाव आहे. तो मारेगाव येथील निवासी असून नोकरीनिमित्त चंद्रपूर येते वास्तव्यास होता. एका खासगी कंपनीमध्ये कार्यरत असून मंगळवारी रात्री ते आपल्या चारचाकी वाहनाने वणी-मारेगाव मार्गाने प्रवास करीत असताना हा भीषण अपघात घडला.

प्राप्त माहितीनुसार, निंबाळा रोडवर समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सचिन यांच्या वाहनाची समोरून भरधाव येणाऱ्या पिकअप वाहनाशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, त्यांच्या वाहनाच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. गंभीर दुखापतीमुळे सचिन देवाळकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Img 20250103 Wa0009

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहनातून सचिन यांना बाहेर काढून मारेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सचिनच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण मारेगाव शहरावर तथा मित्रपरिवार व कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन लहान मुले असा आप्तपरिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा असा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने देवाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बातमीदार