● दोन लाखाचा मुददेमाल हस्तगत
● शिरपुर पोलीसांची धडक कारवाई
Crime News Wani | शिरपुर पोलीस स्टेशन हददीतील पुरड (नेरड) येथे गुरुवारी दुपारी भर दिवसा घरफोडी करुन चोरटयांने डाव साधला होता. घरातील कपाटातुन सोने चांदीचे दागिने तसेच नगदी लंपास करण्यात आले होते. याप्रकरणी शुक्रवार दिनांक 25 ऑगष्टला गुन्हा नोंद करण्यात आला आणि अवघ्या काही तासातच चोरटयांना जेरबंद करण्यात आले. A crime was registered and the thieves were arrested within hours.
तालुक्यातील पुरड (नेरड) येथे वास्तव्यास असलेल्या देवराव मारुती थेरे (35) यांचे घरी दिनांक 24 ऑगष्ट ला दुपारी 11 ते 4 वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दाराचे कुलूप तोडुन बेडरुम मधील लोखंडी कपाटातुन सोने चांदीचे दागिने तसेच नगदी 15 हजार रुपये लंपास केले होते. याप्रकरणी शिरपुर पोलीसांत शुक्रवारी रितसर तक्रार नोंदविण्यात आली.
शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी या प्रकरणी sdpo गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शन घेत तातडीने तपास यंञणा कार्यान्वित केली. खबऱ्यांच्या मार्फत माग काढला आणि पुरड परिसरातील दहा ते बारा संशयीतांना ताब्यात घेत विचारणा केली असता चोरटे गळाला लागले.
अमोल सोमेश्वर भटवलकर (32), प्रफुल देवीदास मोहीतकर (26) दोन्ही राहणार पुरड (नेरड) असे ताब्यातील चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करत कौशल्यपूर्वक विचारपुस केली असता दोघांनी चोरी केल्याची कबुली दिली.
अटकेतील आरोपींकडून तीन सोन्याच्या अंगठया, डोरले मंगळसुञ, नेकलेस, सोन्याचा गोफ, चांदीचे पैजन व 15 हजार रुपये रोकड असा एकुन 1 लाख 97 हजार रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, SDPO गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात API ठाणेदार गजानन करेवाड, PSI रामेश्वर कांडूरे, अनिल सुरपाम, आशिष टेकाडे, राजन इसनकर, अभिषेक कोषटवार, सुगत दिवेकर, निलेश भुसे, गजानन सावसाकडे, प्रशांत झोड, पल्लवी बल्की यांनी पार पाडली.
ROKHTHOK NEWS