● शिरपुर पोलीसांची कारवाई
● पाच लाख 67 हजाराचा मुददेमाल जप्त
Wani News : मालवाहु वाहनातुन निर्दयीपणे कोंबुन नेत असलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका शिरपुर पोलीसांनी केली. प्राप्त गोपनिय माहितीच्या आधारे पोलीसांनी सैदाबाद फाटा परिसरात सापळा रचून तीन बैलांची सुटका केली तर पाच लाख 67 हजारांचा मुददेमाल जप्त केला आहे. ही कारवाई दिनांक 21 जानेवारीला दुपारी करण्यात आली. Police rescued three bulls by laying a trap in Saidabad Fata area

शिरपुर पोलीस ठाण्याच्या हददीतील महामार्गावरुन तेलंगणा राज्यात गोवंश तस्करी करण्यात येते. नागपुर, मध्यप्रदेश तसेच अन्य ठिकाणावरुन गोवंशाची निर्दयीपणे वाहतुक करण्यात येत असल्याचे वास्तव सातत्याने पोलीस कारवाई वरुन उघड झाले आहे. ठाणेदार संजय राठोड यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलीसांनी सैदाबाद फाटा परिसरात सापळा रचला आणि संशयीत वाहनाला ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत अमोल सुधाकर घुगुल (35) रा. नेरड (पुरड) हल्ली मुक्काम भिमनगर वणी याला अटक करण्यात आली असुन वाहन क्रमांक MH-29-BE-6172 ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी तीन बैलांची सुटका करण्यात आली आहे. सदर कारवाई API संजय राठोड, अनिल सुरपाम, राजन इसंकर, अभिजित कोशटवार यांनी केली.
Rokhthok News