Home Breaking News मनसेचा जल्‍लोष.. भगव्‍या रंगात रंगले शहर

मनसेचा जल्‍लोष.. भगव्‍या रंगात रंगले शहर

● प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा, आनंदोत्‍सवच वेगळा

740
C1 20240122 19134664
प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा, आनंदोत्‍सवच वेगळा

MNS NEWS WANI : “रामलल्‍ला”च्‍या अयोध्‍येतील अभुतपुर्व प्राणप्रतिष्‍ठापना सोहळयाचे औचित्‍य साधून सोमवार दिनांक 22 जानेवारीला संपुर्ण जगात आनंदोत्‍सव साजरा करण्‍यात येत आहे. महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांचे नेतृत्‍वात वणी शहर भगव्‍या रंगात रंगले आहे. तर प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा, आनंदोत्‍सवच वेगळा हे बघायला मिळत आहे. Under the leadership of Maharashtra Navnirman Sena leader Raju Umbarkar, Wani city has been painted in saffron.

Img 20250422 wa0027

संपुर्ण देशवासिंयासाठी अभिमानास्‍पद असलेल्‍या अयोध्‍येतील श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि राममूर्तीची प्राण प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्‍ते सोमवारी दुपारी 12 वाजताच्‍यादरम्‍यान  वेदमंत्रांच्या उच्चारवात संपन्‍न झाली. यानंतर देशभरात रामभक्त आणि सामान्य जनतेमध्ये आनंद आणि उत्साहाची भावना पाहायला मिळत आहे.

Img 20250103 Wa0009

श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे पाचशे वर्षानंतर श्री राम मंदिराचे स्वप्न साकार होत आहे. या अभुतपुर्व सोहळयाचे औचित्‍य साधून महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांनी मिरवणूक, होमहवन आदी धार्मिक विधींचे आयोजन केले आहे तर लेझर शो आणि फटाक्यांची शाही आतिषबाजी करण्‍यात येणार आहे.

आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि 32 वर्षांनी शरयू नदी हसली ! जय श्रीराम !

C1 20240122 19033693
तब्बल तीन दशकांपासून भारतीय समाजकारण आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या अयोध्येतील राममंदिराच्या लढ्याचा आज शेवट गोड झाला. याप्रसंगी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी समाज माध्‍यमांवरुन आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या.

राज तिलक की करो तैयारी आ रहे है भगवाधारी
अयोध्येत झळकले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बॅनर,  यावर राज ठाकरे यांचा भगवाधारी असा उल्लेख करण्‍यात आला आहे. मनसे पदाधिकारी अभिनंद गणेश चव्हाण यांनी केली अयोध्येत केली बॅनरबाजी…