Home Breaking News भिषण अपघात, ट्रकने टाटा सुमो वाहनाला उडवले

भिषण अपघात, ट्रकने टाटा सुमो वाहनाला उडवले

● यवतमाळ मार्गावर घडली घटना ● दोघे गंभीर, पाच जखमी

C1 20240124 14170740
IMG 20260522 WA0013

यवतमाळ मार्गावर घडली घटना
दोघे गंभीर, पाच जखमी

Accident News Wani : यवतमाळ मार्गावर बुधवारी साडे बारा वाजताच्‍या दरम्‍यान भिषण अपघात झाला. यात सिमेंट वाहतुक करणाऱ्या ट्रकने टाटा सुमोला जबर धडक दिली. या अपघातात सुमो वाहनातील प्रवाशी व ट्रक चालक गंभीर जखमी झाले आहेत. प्रत्‍यक्षदर्शीनी अपघात होताच जखमींना ग्रामीण रुग्‍णांलयात हलवले आहे. A cement truck hit a Tata Sumo.

शेख नवाज शेख मुझफ्फर (28) असे सुमो चालकाचे नांव असल्‍याचे बोलल्‍या जात असुन तो मारेगाव येथील निवासी होता. आपल्‍या परिवारांसह चंद्रपुर येथील आजारी नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असतांना हा भिषण अपघात घडला. सुमो वाहनात दोन लहान मुले व तीन महिलांचा समावेश होता.

IMG 20260511 WA0005

मारेगांव येथील एका परिवारातील व्‍यक्‍ती टाटा सुमो वाहन क्रमांक MH -13- DE -7906 ने चंद्रपुरला जात होते तर सिमेंटची वाहतुक करणारा ट्रक क्रमांक MH -34 -BG- 1337 हे भरधाव वाहन यवतमाळच्‍या दिशेने जात असतांना ही भिषण घटना घडली. यावेळी प्रत्‍यक्षदर्शींनी घटनेच्‍या ठिकाणी धाव घेत जखमींना तातडीने उपचारार्थ हलवले. तसेच पोलीसांना सुचित करण्‍यात आले आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009