● तीन वर्षांपासून देत होता चकमा
Crime News | शिरपुर पोलीस स्टेशन हद्दीत दरोड्याच्या तयारीतील आरोपी मागील तीन वर्षांपासून पोलिसांना चकमा देत होता. ठाणेदार माधव शिंदे यांनी गोपनीय बतमीदारांच्या माध्यमातून पाळत ठेवली होती. अखेर त्याला 23 ऑक्टोबर ला घुग्गुस येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. Thanedar Madhav Shinde kept the surveillance through confidential informants.

नौशाद शहादातुल्ला कुरेशी (34) वार्ड क्र.2 घुग्गुस ता. जि. चंद्रपुर असे सराईत गुन्हेगारांचे नाव आहे. शिरपूर पोलीस ठाण्यात त्यांचेवर कलम 399,402 भा.द.वी. सहकलम 4/25 शस्त्र अधिनियम नुसार 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा शोध घेत असताना तो पोलिसांना गुंगारा देत पसार होत होता.
ठाणेदार माधव शिंदे यांनी काटेकोरपणे पाळत ठेवून पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बुधवंत व पथकांनी त्याला जेरबंद केले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, sdpo गणेश किंन्द्रे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार माधव शिंदे, psi रावसाहेब बुधवत, सुनिल दुबे, विनोद काकडे, पंकज कुडमेथे यांनी पार पाडली.
Rokhthok News