Home Breaking News Madhvi latha : हैद्राबादची तोफ वणीत धडाडणार

Madhvi latha : हैद्राबादची तोफ वणीत धडाडणार

● बोदकुरवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली

C1 20241118 10352754

बोदकुरवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली

Political News | दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री तथा भाजपाच्‍या नेत्‍या माधवी लता या आक्रमक बाण्‍याच्‍या आहेत. त्‍यांना हैद्राबाद ची तोफ म्‍हणुन ओळखल्‍या जाते. वणी विधानसभा निवडणुकीतील प्रचार रणसंग्रामात भाजपा उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सोमवारी भव्‍य रॅलीचे आयोजन केले आहे या रॅलीत हेद्राबादची तोफ धडाडणार आहे. Madhavi latha: Hyderabad’s cannon will crackle in the WANI

वणी विधानसभेची निवडणुक प्रचंड चुरशीची होतांना दिसत आहे. प्रमुख चार उमेदवारात अटितटीची लढत होण्‍याचे संकेत मिळत आहे. प्रत्‍येक उमेदवार आपली ताकद दाखवत आहे. रविवारी दोन प्रमुख उमेदवारांच्‍या भव्‍य मिरवणुका संपन्‍न झाल्‍या. प्रचाराच्‍या शेवटच्‍या दिवशी सोमवारी पुन्‍हा प्रमुख दोन उमेदवार आपला जनाधार वणीकरांना दाखवुन देणार आहे.

माधवी लता यांनी हैद्राबाद मधुन लोकसभेची निवडणुक AIMIM चे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांचे विरुद्ध लढली होती. आक्रमक भाषण शैलीच्‍या बळावर माधवी लता यांनी संपुर्ण देशात ओळख निर्माण केली आहे. वणीतील भव्‍य रॅलीत त्‍यांचा असणारा सहभाग भाजपा उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना बळ देणारा ठरणार आहे.

Img 20250103 Wa0009

शासकीय मैदान येथुन सकाळी 11 वाजता रॅली निघणार असुन शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत टिळक चौकात मिरवणुकीची सांगता होईल. यावेळी उपस्थित नागरीकांना प्रमुख मान्‍यवर मार्गदर्शन करणार आहे. तरी वणी,मारेगाव व झरी येथील हजारो कार्यकर्त्‍यांनी उपस्‍थीत राहावे असे आवाहन महायुती कडुन करण्‍यात येत आहे.
ROKHTHOK NEWS