● पोलिस प्रशासनाच्या संवेदनशीलतेची झलक
BIG NEWS :
वणी शहरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून एका बेघर मनोरुग्णामुळे भयभीत होते. रस्त्यावर राहणारा तो ‘प्रभूजी’ गाड्यांवर दगड फेकत असे, लोकांना घाबरवत असे. पोलिस स्टेशनमध्ये रोज तक्रारींचा पाऊस पडत होता – “तो कुणाचा आहे? त्याचा परिवार कुठे आहे?” याबाबत कोणालाही कल्पना नव्हती, पोलिसांनी त्या मनोरुग्ण “प्रभुजी”ला नंददीप फाऊंडेशन, यवतमाळ येथील निवारा केंद्रात दाखल केले. सध्यस्थीतीत एका निराधाराला नवा श्वास मिळाला. From violence to humanity: A helpless person gets a new lease of life
पण सत्य हे की… त्या प्रभूजींचे कुणीच नव्हते ! भूक, आजार आणि उपेक्षेमुळे ते अधिकच हिंसक झाला होता. शहरात त्याचा चाललेला उपद्व्याप वाढत असताना ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी संवेदनशीलतेचा परिचय दिला. त्याला मानसोपचाराची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याला यवतमाळ येथील नंददीप फाऊंडेशनच्या स्वाधीन केले.
सुरुवातीला भीतीदायक आणि आक्रमक वाटणारा तोच प्रभूजी, आज मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांच्या उपचारांमुळे शांत, संयमी आणि सहकार्यशील झाला आहे. आता तो छोट्यामोठ्या कामात मदत करतो आणि लवकरच आपल्या परिवारात परत जाण्यास सज्ज आहे.
“जेथे दयाळूपणा असतो, तेथे चमत्कार घडतात” हे ठाणेदारांच्या कृतीतून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी वणी पोलिस प्रशासनाच्या संवेदनशीलतेची झलक दिसून आली तर नंददीप फाऊंडेशनच्या सेवाभावी परिवाराची सहिष्णुता उजागर झाली आहे. सोबतच डॉक्टरांच्या नि:स्वार्थ सेवेची पावती म्हणजे “प्रभुजी” पुन्हा नव्या जीवनाचा प्रवास करू शकणार आहे.
ROKHTHOK






