● नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज…..
BIG NEWS : शहरातील गणेशपुर परिसरातील उमेद पार्क येथे रविवारी पहाटे सुमारे दोन वाजताच्या सुमारास तिघा संशयित व्यक्तींचा अर्धनग्न अवस्थेत मुक्तसंचार सुरू असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (तिसऱ्या डोळ्यात) कैद झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘Shorts-vest’ gang caught in the third eye
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तिघांपैकी एकाने बनियन व हाफ बरमुडा परिधान केलेला, तर उर्वरित दोघे केवळ बरमुडा घालून फिरताना दिसत आहेत. यातील एका व्यक्तीच्या हातात काठी किंवा लोखंडी रॉड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने ‘चड्डी-बनियन गॅंग’ सक्रिय असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उमेद पार्क परिसरात नोकरदार वर्ग वास्तव्यास आहे. मोठया प्रमाणात घरांचे बांधकाम सुरू आहेत. काही ठिकाणी तुरळक बंगले असून रात्रीच्या वेळी परिसर तुलनेने शांत असतो. तसेच या भागालगत कायर व घोंसा मार्गे जाणारा राज्यमार्ग असल्याने चोरट्यांना आपले लक्ष्य साध्य करून पळण्याचा मार्ग लगतच आहे. तसेच दिवसा या परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, तसेच संशयितांवर तात्काळ कारवाई करून अशा प्रकारे रात्री-बेरात्री फिरणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.
ROKHTHOK






