Home Breaking News जल्लोष, उत्साह आणि तरुणाईचा माहोल

जल्लोष, उत्साह आणि तरुणाईचा माहोल

● दिवस-रात्र क्रिकेटचा रंगतदार थरार

C1 20260412

दिवस-रात्र क्रिकेटचा रंगतदार थरार

Rokhthok : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरलेल्या ‘दिवस व रात्र’ वणी प्रीमियम लीग मनसे चषक दिवस-रात्र क्रिकेटचा रंगतदार थरार सुरू झालाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या भव्य स्पर्धेने पहिल्याच दिवशी उत्साहाची उंची गाठली आहे. जल्लोष, उत्साह आणि तरुणाईचा रंगतदार माहोल वणीकर नागरिकांना अनुभवता येणार आहे. An atmosphere of joy, enthusiasm and youth

मैदानावर आकर्षक सजावट, प्रकाशझोत आणि प्रेक्षकांची गर्दी यामुळे संपूर्ण वातावरण क्रीडामय झाले आहे. ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लाखो रुपयांच्या बक्षिसांमुळे खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, प्रत्येक संघ विजेतेपदासाठी सज्ज झाला आहे.

आयोजित स्पर्धेसाठी मनसे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर, गोविंद थेरे, व्यापारी सेनेचे शहराध्यक्ष राकेश वैद्य, लकी सोमकुंवर, दिलीप मस्के, विलन बोदाडकर, राजू बोदाडकर, अविनाश पाटील, रवि आंबटकर, महेश हातगावकर, संजय गौरकर, मयूर घाटोळे तसेच आयोजक समितीचे शैलेश ढोके, नदीम शेख विशेष परिश्रम घेताहेत.

Img 20250103 Wa0009

क्रिकेटवेड्या वणीकरांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ‘वणी प्रीमियर लीग’ (WPL) स्पर्धेत कॉटन सुपर किंग्स, आयडी इलेव्हन, नाइट रायडर्स, परी इलेव्हन, झिहू 11 यांसारख्या 14 संघांनी सहभाग नोंदवला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस वणी शहरात दिवस-रात्र क्रिकेटचा थरार रंगणार असून, क्रीडाप्रेमींना रोमांचक सामने अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
Wani News