● शास्त्रीनगर परिसरातील घटना
Sad News : शहरातील शास्त्रीनगर परिसरात आज एक दुर्दैवी घटना घडली. विजेचा धक्का लागून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. छाया नंदकिशोर घुले (35) रा. शास्त्रीनगर, वणी असे मृत महिलेचे नाव आहे. Woman dies tragically due to electric shock
प्राप्त माहितीनुसार, छाया घुले या आपल्या घरी मोटरद्वारे पाणी भरत असताना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत त्या जागीच बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
सदर घटनेची माहिती वणी पोलीस स्टेशनला देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
Rokhthok






