Home Breaking News Breaking .. तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

Breaking .. तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

● विष प्राशन करून जीवन संपवले, मारेगाव तालुक्यातील घटना.....

C1 20260424

विष प्राशन करून जीवन संपवले, मारेगाव तालुक्यातील घटना…..

Sad News : मारेगाव तालुक्यातील गोरज येथे एका 42 वर्षीय तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. गुरुवार दिनांक 23 एप्रिलला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. Breaking .. Young farmer commits suicide

अविनाश लटारी पानघाटे (42) असे मृतकाचे नाव आहे. ते मारेगाव तालुक्यातील गोरज येथे वास्तव्यास होते. त्यांच्या नावावर सुमारे 3 एकर शेती असून त्यावर ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. सततची नापिकी आणि आर्थिक विवंचना यामुळे ते त्रस्त असल्याचे बोलल्याजाते. तसेच शेतीसाठी घेतलेल्या बँक कर्जाचा ताण असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे.

मृतकाचे कुटुंबीय लग्नसमारंभाहून परत आल्यानंतर अविनाश घरी दिसून न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. त्यांना फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. यावेळी वनोजा देवी शेतशिवारातील उत्तम पानघाटे यांच्या शेतात एका झाडाजवळ अविनाश बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांच्या तोंडातून पांढरा फेस येत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Img 20250103 Wa0009

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे हलविण्यात आला. या प्रकरणी मारेगावचे ठाणेदार शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके, संभा लेंनगुरे पुढील तपास करताहेत.
Rokhthok

Previous articleWCL कर्मचाऱ्यांचे घर चोरट्यांनी फोडले
Next articleजातिवाचक शिवीगाळ, गुन्हा दाखल
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.