Home Breaking News WCL कर्मचाऱ्यांचे घर चोरट्यांनी फोडले

WCL कर्मचाऱ्यांचे घर चोरट्यांनी फोडले

● साडे सात तोळे सोन्याचे दागिने लंपास

C1 20260423

साडे सात तोळे सोन्याचे दागिने लंपास

CRIME NEWS : शहरातील गणेशपूर परिसरात अज्ञात चोरट्याने वेकोली कर्मचाऱ्यांच्या बंद घराला लक्ष करत 2.30 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना 21 ते 22 एप्रिलच्या दरम्यान घडली. कुलूपबंद घराची रेकी करून चोरटे मध्यरात्रीच्या दरम्यान आपले इस्पित साध्य करत असल्याचे दिसत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Thieves break into WCL employees’ house.

रामरतन सिताराम हरडे (59), हे वेकोली कर्मचारी असून मंगलमुर्ती पार्क, प्लॉट क्र. 42, गणेशपूर येथे वास्तव्यास आहेत. आपल्या वैयक्तिक कामानिमित्त ते घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते. कुलूपबंद घर दिसताच अज्ञात चोरट्यानी डाव साधला आणि सोन्याचा ऐवज लंपास केला.

IMG 20260511 WA0005

चोरट्यानी घरात प्रवेश केल्यानंतर 40 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, 20 ग्रॅम सोन्याचा गोप, एक तोळा वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच 6 ग्रॅम वजनी कानातील लटकन असा एकूण 76 ग्रॅम वजनाचा, अंदाजे 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

Img 20250103 Wa0009

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 331 (3), 331 (4) व 305 (a) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हेगारांची कुंडली ओळखणारे PSI साजिद सैय्यद करीत आहे.
ROKHTHOK