Home Breaking News सूर्य आग ओकतोय ! एप्रिलमध्येच ‘मे’ हिटचा तडाखा

सूर्य आग ओकतोय ! एप्रिलमध्येच ‘मे’ हिटचा तडाखा

●विदर्भात तापमानाचा कहर, रस्त्यावर शुकशुकाट, नागरिकांनी सावधानता बाळगावी...

C1 20260427

विदर्भात तापमानाचा कहर, रस्त्यावर शुकशुकाट, नागरिकांनी सावधानता बाळगावी…

Rokhthok | विदर्भात उष्णतेचा प्रचंड तडाखा बसत असून एप्रिल महिन्यातच मे महिन्याची तीव्रता अनुभवायला मिळत आहे. रविवारी विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला असून नागरिकांचे जनजीवन अक्षरशः हैराण झाले आहे. वणी शहरात रस्त्यावर शुकशुकाट जाणवत असून वातानुकूलित सामुग्री कुचकामी ठरताहेत. The sun is burning! ‘May’ hits in April itself

रविवारच्या नोंदीनुसार, विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक 47°C तापमानाची नोंद झाली, तर चंद्रपूरमध्ये 44°C पर्यंत पारा पोहोचला. नागपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती या शहरांमध्येही तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिल्याने उष्णतेची तीव्रता कमालीची वाढली आहे.

झपाट्याने तापमानात झालेल्या या वाढीमुळे नागरिकांमध्ये उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे असून जास्तीत-जास्त शुद्ध पाणी प्यावे, सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजतापर्यंत उन्हात जाण्याचे टाळावे, शीतपेय, लिंबू सरबत सेवन करावे, उन्हात जायचे काम पडल्यास दुपट्टा, टोपी वापरणे गरजेचे आहे. या दरम्यान अस्वस्थता जाणवल्यास किंवा ताप, उलटी, मळमळ होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
डॉ. गणेश लिमजे
सुगम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वणी

Img 20250103 Wa0009

उष्णतेच्या या लाटेमुळे विदर्भात पारा चांगलाच चढलाय. सूर्य आग ओकतोय. नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून काही दिवस तापमान जैसे-थे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
-बातमीदार-

Previous articleजातिवाचक शिवीगाळ, गुन्हा दाखल
Next articleआधी जातनिहाय जनगणना, नंतरच डिलिमिटेशन.!
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.