Home Breaking News भीषण अपघात….तिघे ठार, एक गंभीर

भीषण अपघात….तिघे ठार, एक गंभीर

● यवतमाळ महामार्गावर घडली घटना

यवतमाळ महामार्गावर घडली घटना

Accident News | वृत्तपत्राचे पार्सल पोहचविणाऱ्या मारुती ओमनी कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने जबर धडक दिली. यात तिघे ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवार दि. 11जुलै ला सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास यवतमाळ महामार्गावरील कठोडा शिवारात घडली. A Maruti Omni car delivering newspaper parcels was hit by a speeding truck coming in the opposite direction. Three people were killed and one was seriously injured.

नागपूर वरून मराठी वृत्तपत्राचे पार्सल घेऊन वरोरा, वणी, मारेगाव मार्गे पांढरकवडा येथे ओमनी कार क्रमांक MH-34- K -1954 जात होती. पहाटे मारेगाव येथे पार्सल टाकून ती कार रवाना झाली. आणि अवघ्या काही वेळातच महामार्गावरील काठोडा जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक ने कार ला भीषण धडक दिली.

IMG 20260511 WA0005

अपघाताची भीषणता एवढी भयानक होती की कारचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. यावेळी कार मध्ये चालक, वाहक व दोन प्रवाशी होते. यातील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही बाब प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना कळवली. तर नागरिकांनी जखमींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सर्व कार मध्ये फसलेल्या अवस्थेत होते.

Img 20250103 Wa0009

पांढरकवडा पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्यांनी वाहनात फसलेल्याना बाहेर काढले तर जखमी व्यक्तीला तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले. या भीषण अपघातातील मृतकांची नावे कळू शकली नाही. अपघाताची घटना घडताच ट्रक चालक ट्रक सह पसार झाला आहे.
Rokhthok News