Home Breaking News घरी कोणीच नसताना त्याने घेतला ‘गळफास’

घरी कोणीच नसताना त्याने घेतला ‘गळफास’

बाबापूर येथील घटना

वणी :- शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या बाबापूर येथील 27 वर्षीय युवकाने घरी कोणी नसल्याचे पाहून गळफास घेतला. ही घटना दि 28 ऑक्टोबर ला सायंकाळी 7 वाजताचे सुमारास घडली.

विशाल प्रकाश देवतळे (27) असे मृतकाचे नाव आहे, तो बाबापूर येथील निवासी असून मोलमजुरी चे काम करायचा. बुधवारी घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

विशाल याने हे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
वणी: बातमीदार

Img 20250103 Wa0009