● आगार व्यवस्थापकांना निवेदन
वणी | चंद्रपूर- मुकूटबन व्हाया शिंदोला बसफेरी तात्काळ सुरू करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी आगार व्यवस्थापकांना देत ती… बस तात्काळ सुरू करा…अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा दिला.
चंद्रपूर आगाराची यवतमाळ जिल्ह्यातील मुकूटबन येथे ये-जा करणारी बस मुंगोली येथील पूल नादुरुस्त असल्याने बंद करण्यात आली होती. सध्यस्थीतीत पूल व वेकोलीचा रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे. मात्र राज्य मार्ग परिवहन विभागाने बसफेरी अद्याप सुरू केली नाही. यामुळे शिंदोला परिसरातील 20 ते 25 गावातील विध्यार्थी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच प्रवाशी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पूल व रस्ता योग्य नसल्याने राज्य मार्ग परिवहन विभागाने तात्पुरती बसफेरी बंद केली आहे. यामुळे मुंगोली, माथोली, साखरा, परमडोह, चिखली, टाकळी, शेवाळा, चनाखा, कोलगाव, शिवणी, येनक, येनाडी, पाथरी, कुर्ली, शिंदोला व परिसरातील शाळा, महाविद्यालय व शिकवणी वर्गात शिकणारे विध्यार्थी- विद्यार्थिनींची तसेच महिला, गर्भवती, विविध आजाराने ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चंद्रपूर ला ये-जा करणे दुरापास्त झाले आहे.
चंद्रपूर- मुकूटबन व्हाया शिंदोला बसफेरी तात्काळ सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी संजय निखाडे यांच्यासह समृद्धी थोराक, आरती राऊत, सोनू फुलमारे, यशस्वी डाहकी, अंकिता खंडाळकर, दीपाली चटप, प्रणाली थेरे ह्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
वणी : बातमीदार





