● प्रेस वेल्फेअर असोसिएशनचे आयोजन
Wani News :
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील प्रेस वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आंतर शालेय समहू नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेक्षक, पालक व विध्यार्थ्यांना नृत्यांची धमाल अनुभवता येणार आहे. Inter-school dance competition on Republic Day
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या करिता या नृत्य स्पर्धेचे आयोजन येथील एसपीएम हायस्कूल रंगमंचावर करण्यात आले आहे. अ व ब अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. दोन्ही गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या शाळांना दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे स्मृती प्रित्यर्थ खासदार प्रतिभा धानोरकर यांचे वतीने स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
स्व. ऋषि पिदूरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ योगेश व आकाश पिदूरकर यांचे कडुन उत्कृष्ट नृत्यास बाळशास्त्री जांभेकर फिरता करंडक प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेत शहरातील शाळांनी सहभागी होण्यासाठी स्पर्धा संयोजक विनोद ताजने यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन अध्यक्ष अनिल बिलोरिया व सचिव सागर बोढे यांनी केले आहे.
Rokhthok






