Home Breaking News तरुणाने विष प्राशन करून संपवले जीवन

तरुणाने विष प्राशन करून संपवले जीवन

● हनुमान मंदिराजवळ केली आत्महत्या

C1 20240320 15003797

● हनुमान मंदिराजवळ केली आत्महत्या

Sad News : भालर मार्गावरील हनुमान मंदिराजवळ एक 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. विषारी द्रव प्राशन करून त्याने आपले जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही घटना बुधवार दिनांक 20 मार्चला पहाटे उघडकीस आली. Preliminary speculation is that he ended his life by consuming poisonous liquid.

मंगेश प्रभाकर डोंगे (32) असे मृतकाचे नाव आहे. तो नांदेपेरा येथील निवासी होता. शेतीवाडी सोबतच अन्य व्यवसाय करून तो परिवाराचा गाडा हकायचा. मंगळवारी तो नांदेपेरा येथून वणीला आला होता. त्याने रात्रीच्या सुमारास विष प्राशन केले असावे असा कयास वर्तविण्यात येत आहे.

तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे कळू शकले नाही. त्याच्या आत्मघाती निर्णयाने परिवारासह मित्रमंडळी हादरून गेली आहे. बुधवारी सकाळी स्थानिकांना त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले, पोलिसांनी पंचनामा केला असून शव उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009