Home Breaking News शिक्षक हेमंत माथनकर यांचे निधन

शिक्षक हेमंत माथनकर यांचे निधन

वणी : हेमंत पु. माथनकर (52) हे पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होते. त्यांची रात्री अचानक प्रकृती बिघडली त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवार दि. 18 ऑक्टोबरला पहाटे 4 वाजता उपचारादरम्यान निधन झाले.

हेमंत माथनकर यांना रात्री अस्वस्थ वाटायला लागले होते. घरची मंडळी व शेजारी वास्तव्यास असलेल्यानी त्यांना रात्री 3 वाजता येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हेमंत माथनकर हे मनमिळावू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचं अचानक झालेलं निधन चटका लावणारं आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी गीतांजली, मुलगा नचिकेत, श्रेयस असा मोठा आप्तस्वकीय परिवार आहे. ते पत्रकार तुषार अतकारे यांचे बहीण जावई होते.
वणी: बातमीदार

Img 20250103 Wa0009
( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)