● पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाची जोरदार मुसंडी…..
ROKHTHOK | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा धुव्वा उडवला. या विजयाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. वणी विधानसभेचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावर फटाक्यांची आतिषबाजीत उपस्थित नागरिकांना झलमुरी वाटून विजयोत्सव साजरा केला. BJP celebrated its victory with jubilation
मागील अनेक वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची सत्ता पश्चिम बंगाल मध्ये होती. अँटी इंकम्बन्सी आणि भाजपने आखलेली रणनीती यामुळे सत्ताधाऱ्यांची दाणादाण उडाली. जोरदार मुसंडी मारत भाजपने दणदणीत यश संपादन केले आणि सत्ता स्थापणेकडे आगेकूच केली. तसेच परंपरागत भवाणीपुर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव तृणमूलच्या जिव्हारी लागला.

विजयाच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच उपस्थितांना झलमुरी वाटून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. भाजपच्या या विजयामुळे देशाच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यावेळी नगराध्यक्ष विद्या आत्राम, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, उपनगराध्यक्ष राकेश बुग्गेवार, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपलशेंडे, ऍड. निलेश चौधरी, नगरसेवक रवी बेलूरकर, प्रदीप जेऊरकर, अंकुश बोढे, संतोष डंभारे, लवलेश लाल, लक्ष्मण उरकुडे, अनिल चिंडालिया, आशिष डंभारे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






