Home क्राईम कौटुंबिक वादातून जबर मारहाण

कौटुंबिक वादातून जबर मारहाण

● मारेगाव पोलिसांनी केला गुन्हा नोंद

C1 20260429

मारेगाव पोलिसांनी केला गुन्हा नोंद

Rokhthok : मारेगाव तालुक्यातील लाखापुर येथे कौटुंबिक वादातून मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ही घटना मंगळवार दिनांक 28 एप्रिलला रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. Violent beating due to family dispute, case registered

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय तात्याजी आसेकर (31) हे लाखापुर येथे वास्तव्यास आहेत तसेच रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या शेजारी राहणारे व नातेवाईक असलेले अर्जुन गोपाल हरोर (43) हे मद्यपाणाच्या सवयीमुळे वारंवार वाद घालत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

घटनेच्या दिवशी आरोपी अर्जुन हरोर हे फिर्यादीच्या बहिणीसोबत वाद घालत होते. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या अक्षय आसेकर यांच्याशी आरोपीने शिवीगाळ करत हातातील काठीने मारहाण केली. यात आसेकर यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. तसेच “येथून निघून जा, अन्यथा जिवे मारून टाकीन” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Img 20250103 Wa0009

याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 352, 351(2)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर किनाके व पोलीस शिपाई सागर दिपेवार पुढील तपास करत आहेत.