● नांदेपेरा येथे अनुभवता येणार थरार
Wani News :
तालुक्यातील नांदेपेरा येथे दि. 25, 26, 27 मार्चला भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील शेतकरी व बैलगाडा शौकिनांना बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवता येणार आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार असून विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. ‘Bull Cart Race’ offers attractive prizes
स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते होणार आहे तर अध्यक्षस्थानी विद्यमान आमदार संजय देरकर तर प्रमुख अतिथी म्हणून संजय खांडे यांची उपस्थिती राहणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
आयोजित स्पर्धेसाठी परिसरातील शेतकरी व बैलगाडा शौकिनांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे ठिकाण किसन महादेव डोंगे यांच्या शेतात (डोंगरा रोड) निश्चित करण्यात आले आहे.
स्पर्धेत ‘अ’ व ‘ब’ अशा दोन गटांमध्ये बैलगाड्यांची शर्यत होणार असून विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. ‘अ’ गटासाठी प्रथम बक्षीस तब्बल 51 हजार रुपये ठेवण्यात आले आहे, तर ‘ब’ गटासाठी प्रथम बक्षीस 21 हजार रुपये आहे. याशिवाय इतर क्रमांकांसाठीही हजारोंच्या रोख बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे.
प्रवेश शुल्क ‘अ’ गटासाठी 1200 रुपये व ‘ब’ गटासाठी 700 रुपये ठेवण्यात आले आहे, तर तक्रार शुल्क 2000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. आयोजकांकडून सहभागी व प्रेक्षकांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या भव्य बैलगाडा शर्यतीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Rokhthok






