
● युवासेना तालुकाप्रमुख पदी नियुक्ती
Rokhthok |
वणी तालुक्यातील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले महेश सोमलकर यांची युवासेना तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक 5 मार्चला शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. माजी पंचायत समिती सभापती दिवंगत बाळू सोमलकर यांचा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी चुलत भाऊ ‘महेश’ सज्ज झाला आहे. ‘Mahesh’ ready to carry on ‘Balu”s political legacy
महेश सोमलकर हे मागील वीस वर्षांपासून शिवसेनेत सक्रियपणे कार्यरत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला होता. परिसरात कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतरही त्यांनी माजी मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांचे मोठे बंधू व माजी पंचायत समिती सभापती दिवंगत बाळू सोमलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचे धडे घेतले. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय राहून त्यांनी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
महेश सोमलकर यांची 2007 साली सावर्ला येथे शिवसेना शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 2013 मध्ये त्यांची युवासेना उपतालुका प्रमुखपदी निवड झाली. या कालावधीत त्यांनी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. आपल्या या नियुक्तीचे श्रेय त्यांनी आमदार संजय देरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांना दिले आहे. दरम्यान, त्यांच्या या नियुक्तीमुळे वणी तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वणी : बातमीदार






