Home Breaking News Impact… अखेर..वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा नोंद

Impact… अखेर..वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा नोंद

● पालीकेने दाखल केली होती तक्रार ● "रोखठोक" च्‍या बातमीचा परिणाम

C1 20240610 18130063

पालीकेने दाखल केली होती तक्रार
“रोखठोक” च्‍या बातमीचा परिणाम

Impact News| वन विभाग कार्यालयापासुन अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एका झाडाची कत्तल करण्यात आली होती. अतिक्रमण धारकांने कत्‍तल केल्‍याची तक्रार पालीकेचे आरोग्य निरीक्षक भोलेश्‍वर ताराचंद यांनी पोलीसांत केली होती. चौकशीअंती वीस दिवसानंतर पोलीसांनी वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्‍हा नोंद केला आहे. Twenty days after the end of the investigation, the police have registered a crime against the tree cutters.

वणी शहरात अतिक्रमण धारकांनी चांगलाच उच्‍छाद मांडला आहे. मिळेल त्या जागेवर अतिक्रमण धारकांनी बस्तान बसवले आहे. शहरातील संपुर्ण रस्ते अतिक्रमणाने व्यापले आहेत. पालीका प्रशासनाने अतिक्रमण धारकांना लघु व्यवसाया करीता मुकसंमती दिली की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, 1995 मधील कलम 2 (ग) व 3 तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन नियम 2009 सह शासन आदेश अधिसूचना मधील कलम 21(1) व 2 नुसार विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी करणा-यांवर दखलपात्र गुन्हे (F.I.R.) दाखल करण्यात येतात.

Img 20250103 Wa0009

तहसील कार्यालय परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अधिन येत असलेल्‍या नालीवर अतिक्रमण करण्‍यात आले होते. अतिक्रमीत दुकानाच्‍या समोर बदामाचे झाड होते. ते झाड तोडून मिळावे याकरीता सुरेश दादाजी शेंडे व अन्‍य चौघे यांनी पालीकेकडे अर्ज सादर केला होता. परंतु पालीका प्रशासनाने झाड सुस्‍थीतीत असुन आपण आपले अतिक्रमीत दुकान तात्काळ हटवावे असे लेखी कळविले होते.

अतिक्रमीत दुकानासमोरील झाड हटवणार नसल्‍याचे गृहित धरुन अतिक्रमण धारकांने दिनांक 18 मे ला झाडाची कत्‍तल केली. याप्रकरणी वृत्‍त प्रसिध्‍द होताच आरोग्‍य निरिक्षक भोलश्‍वर ताराचंद यांनी मोका पाहणी करून घटनास्थळाचा रितसर पंचनामा केला. याप्रकरणी पोलीसांत तक्रार दाखल करण्‍यात आली होती. अखेर पोलीसांनी सोमवार दिनांक 10 जुन ला सुरेश शेंडे यांचेवर महाराष्‍ट्र (नागरी क्षेञे) झाडाचे संरंक्षण व जतन अधिनियम 21(1) अन्‍वये गुन्‍हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News