● तालुका कृषी साहीत्य विक्रेता संघाची नवी कार्यकारणी गठीत
Wani News | वणी तालुका कृषी साहीत्य विक्रेता संघाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत संघाची नवीन कार्यकारणी सर्वानुमते गठीत करण्यात आली असून, अध्यक्षपदी गेल्या अनेक वर्षांपासून कृषी साहित्य व्यवसायात सक्रिय असलेले देवराव काकडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. Devrao Kakade has been unanimously elected.

यावेळी झालेल्या बैठकीत संघाच्या भावी कामकाजासाठी दिशा निश्चित करत, संघटनेच्या मजबुतीसाठी कार्यक्षम नेतृत्वाची गरज लक्षात घेता ही कार्यकारणी निवडण्यात आली. उपाध्यक्षपदी सागर धवणे तर सचिवपदी भुवन कोंडावार यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारणीच्या या नव्या स्वरूपामुळे कृषी साहीत्य विक्रेत्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. अध्यक्ष देवराव काकडे यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “संघाच्या हितासाठी पारदर्शक आणि कार्यक्षम कारभार करण्याचा आमचा प्रयत्न राहील. कृषी साहीत्य विक्रेत्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी संघ एक सक्रिय व्यासपीठ बनेल.”
या बैठकीस उमेश राजूरकर, प्रशांत पाचभाई, शांतीलाल जैन, किशोर खाडे यांच्यासह तालुक्यातील अनेक कृषी साहीत्य विक्रेते उपस्थित होते. उपस्थित सदस्यांनी नव्या कार्यकारणीला शुभेच्छा देत, संघटनेच्या मजबुतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या नव्या नेतृत्वामुळे तालुक्यातील कृषी साहीत्य व्यवसायाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.
Rokhthok News