Home Breaking News कित्येक मंञी आले आणि गेले..मात्र…!

कित्येक मंञी आले आणि गेले..मात्र…!

● डॉ. लक्ष्‍मण यादव यांचे प्रतिपादन ● ओबीसींच्‍या एल्‍गार मोर्चाने वेधले लक्ष

818

डॉ. लक्ष्‍मण यादव यांचे प्रतिपादन
ओबीसींच्‍या एल्‍गार मोर्चाने वेधले लक्ष

OBC NEWS WANI: देशात मंञी, कॅबिनेट मंञी, मुख्‍यमंञी, उपमुख्‍यमंञी पदासाठी आमदार विकल्‍या गेले आहे. कित्‍येक मंञी आले आणि गेले त्‍यांचे नांव कुणीही घेत नाही. मात्र विचाराची लढाई लढणाऱ्या व्‍ही.पी. सिंग, मंडल, लोहीया, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव आज सुध्‍दा घेतल्‍या जात असल्याचे डॉ. लक्ष्‍मण यादव यांनी एल्‍गार मोर्चात स्पष्ट केले. No one takes the name of how many ministers have come and gone. But the name of the one who fights the battle of thought is taken

Img 20250422 wa0027

वणी, झरी, मारेगाव येथील जातनिहाय जनगणना कृती समिती व महीला समन्‍वय समितीने दि. 11 फेब्रुवारी रोजी वणीत विविध मागण्‍या लावुन धरत एल्‍गार मोर्चाचे आयोजन केले होते. शहरातील शासकीय मैदानावरून सुरवात झालेल्‍या एल्‍गार मोर्चात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार विश्‍वास नांदेकर, संजय देरकर, किरण देरकर, टिकाराम कोंगरे, संजय खाडे,  विजय पिदुरकर, प्रमोद वासेकर, फाल्‍गुन गोहकार आदींनी सहभाग घेतला होता.

Img 20250103 Wa0009

एल्‍गार मोर्चात पुढे बोलतांना डॉ. लक्ष्‍मण यादव म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चार मुलं मरण पावली. पत्‍नीला कमी वयात देवाज्ञा झाली, स्‍वताच घर बनवु शकले असते, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडले नसते. समाज झोपलेला असतांना स्‍वता: जागण्‍याचे काम आंबेडकरांनी केले. आयोजकांनी रॅली काढली तर त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल केल्‍या जाते. समाजाला जागृत करण्‍याकरीता पुढील रॅली नागपुर येथील दिक्षा भूमीवर काढा असे आवाहन डॉ. लक्ष्‍मण यादव यांनी केले.

शहरातील शासकीय मैदान येथुन मोर्चाला सुरवात झाली. विविध मार्गाने मार्गक्रमण करीत निघालेल्‍या मोर्चाने लक्ष वेधल्‍याचे दिसुन आले. एल्‍गार मोर्चाच्‍या माध्‍यमातुन मराठा समाजाला सरसकट कुनबी प्रमाणपत्र देउन त्‍यांचा ओबीसी मध्‍ये समावेश करू नये तसेच जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी लावुन धरण्‍यात आली. मराठा समाजाच्‍या दबावामुळे राज्‍य सरकार मराठयांचा ओबीसीत समावेश करीत आहे. आधीच राज्‍यात ओबीसींची संख्‍या अधिक आहे. त्‍यात आता मराठयांचा समावेश होत असल्‍याने ही बाब ओबीसी साठी अन्‍यायकारक असल्‍याचे स्‍पष्‍ट करण्‍यात आले.

बिहार ला शक्‍य, महाराष्‍ट्राला का नाही
मागील अनेक वर्षांपासुन जातीय जनगणनेची मागणी होत आहे. परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. बिहारला शक्‍य आहे, मग महाराष्‍ट्राला का नाही. असा प्रश्‍न ओबीसींनी लक्षवेधी एल्‍गार मोर्चाच्‍या माध्‍यमातुन उपस्‍थीत केला. तर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत विविध मागण्‍या लावुन धरण्‍यात आल्‍या आहे. 
Rokhthok News