Home वणी परिसर तीस वर्षीय तरुणाने मृत्यूला कवटाळले..!

तीस वर्षीय तरुणाने मृत्यूला कवटाळले..!

● परिसरात हळहळ, मृत्यूचे कारण अस्पष्ट.....

C1 20261016

● परिसरात हळहळ, मृत्यूचे कारण अस्पष्ट…..

SAD NEWS :
A thirty-year-old youth ended his life..! वणी शहरातील रंगनाथ नगर परिसरात राहुल देविदास डोलरवार (30) वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, दिनांक 16 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, राहुल डोलरवार हा रंगनाथ नगर येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती समोर येताच परिसरात खळबळ उडाली.

राहुलच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे डोलरवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्याच्या पश्चात आई आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. तरुणाच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ROKHTHOK

Img 20250103 Wa0009
Previous articleयुवासेनेच्या संघटनात्मक वाटचालीला नवे बळ
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.