Home वणी परिसर वणी–उकणी मार्गावर 21 वर्षांनंतर धावली ‘लालपरी’

वणी–उकणी मार्गावर 21 वर्षांनंतर धावली ‘लालपरी’

● ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश, विद्यार्थी, कामगार व नागरिकांना मोठा दिलासा

C1 20260901

ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश, विद्यार्थी, कामगार व नागरिकांना मोठा दिलासा

Wani News :
‘Lalpari’ runs on Wani-Ukani route after 21 years : तब्बल 21 वर्षांपासून बंद असलेली वणी–उकणी मार्गावरील बससेवा अखेर 1 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाली. कामगार नेते संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि आंदोलनाला यश मिळाले.

2005 पासून नियमित बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना खासगी व महागड्या वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. बससेवा सुरू झाल्याने प्रवासाचा खर्च, वेळ आणि सुरक्षिततेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.
या बससेवेचा थेट लाभ उकणी, जुनाडा, पिंपळगाव, बोरगाव, भालर वसाहत आणि भालर या गावांतील नागरिकांना होणार असून, शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा व बाजारपेठेसाठी वणीला ये-जा करणे सुलभ होणार आहे.

पहिल्या फेरीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी चालक व वाहकांचा संजय खाडे यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. खाडे यांनी विद्यार्थ्यांसोबत बसमधून प्रवास करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

Img 20250103 Wa0009

“ही बससेवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी जोडलेली मूलभूत गरज आहे. हा नागरिकांच्या एकजुटीचा विजय आहे,” अशी प्रतिक्रिया कामगार नेते संजय खाडे यांनी व्यक्त केली.
Rokhthok

Previous articleरक्षाबंधनातून स्नेहबंध, संघटनात्मक एकजुटीला नवी ऊर्जा !
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.