Home Breaking News दुचाकी चोरटा पोलीसांच्या‍ अलगद ताब्यात

दुचाकी चोरटा पोलीसांच्या‍ अलगद ताब्यात

● पल्‍सर चोराला नागरीकांनी बदडले

1632

पल्‍सर चोराला नागरीकांनी बदडले

रोखठोक|  वणी परिसरात दुचाकी चोरीच्‍या घटना घडताहेत त्‍यातच चोरटे माञ शिताफीने पलायन करतांना दिसत आहे. साई मंदिर जवळून चोरट्यांने पल्‍सर दुचाकी लंपास केली. त्‍याचा पाठलाग करुन इंदिरा चौकात त्‍याला पकडले असता नागरीकांनी त्‍याला चांगलेच बदडले व पोलीसांच्‍या स्‍वाधीन करण्‍यात आले आहे. A Pulsar bike was stolen from the Sai Mandir area. As soon as the owner of the bike came to know about this, he was chased. He was caught near Indira Chowk.

Img 20250619 wa0016

राजु सुरजपाल कोटारे (27) असे चोरटयाचे नांव असुन तो लालगुडा परिसरातील निवासी आहे. बुधवारी दुपारी त्‍यांने साई मंदिर परिसरातुन पल्‍सर ही दुचाकी लंपास केली. दुचाकीच्‍या मालकाला हे कळताच त्‍याचा पाठलाग करण्‍यात आला. इंदिरा चौकाजवळ त्‍याला पकडण्‍यात आले.

Img 20250103 Wa0009

चोरट्याला पकडताच त्‍याला विचारणा करण्‍यात आली व पोलीसांना सुचित करण्‍यात आले. पोलीसांनी त्‍याला ताब्‍यात घेतले असुन त्‍याने आतापर्यंत किती दुचाकीची चोरी केली हे उलगडणार आहे.

वणीः बातमीदार