Home Breaking News snakebite : सर्पदंश, तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू

snakebite : सर्पदंश, तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू

● परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर

2693
C1 20231109 12151716

परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर

Sad News Wani| तालुक्यातील रासा शेत शिवारात सर्पदंश झाल्याने 35 वर्षीय तरुण होतकरू शेतकऱ्याचा मृत्यू झाला. आपल्या शेतात पिकांवर फवारणी करत असताना ही दुःखद घटना दिनांक 8 नोव्हेंबर ला दुपारी घडली. A 35-year-old budding farmer died of snakebite.

Img 20250422 wa0027

नितीन गुलाब धांडे (35) असे मृतकाचे नाव आहे, तो आपल्या परिवारासह रासा येथे वास्तव्यास होता. घटनेच्या दिवशी आपल्या शेतातील पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करत होता. त्याचवेळी त्याला सापाने दंश केला. तातडीने त्याला वणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

Img 20250103 Wa0009

प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. नागपूर येथे जात असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याचे पश्चात गर्भवती पत्नी, 3 वर्षाची मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. त्याच्या अनपेक्षित मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केल्या जात असून कर्ता तरुण गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Rokhthok News