● विद्यार्थिनीसोबत संशयास्पद वागणूक !
● त्या.. शिक्षकावर कारवाईची मागणी
● शाळेतील मारहाणीचा तो VDO बघाच
Bad News | जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक एखाद्या संस्थानचा “मंडलिक” असल्याचा आव आणून मनमर्जी करत असेल आणि शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना केल्याची चर्चा होत असेल तर त्याला चोप मिळणारच ! यवतमाळ तालुक्यातील बेलोरा येथे महाराष्ट्रदिनी ग्रामस्थांनी त्या रंगेल शिक्षकाला चांगलेच बदडल्याची घटना घडली. That…teacher was badly beaten by the villagers, suspicious behavior with the student
प्राप्त माहितीनुसार, सदर प्रभारी मुख्याध्यापक गेल्या काही काळापासून शाळेत कार्यरत आहेत. त्यांची विद्यार्थिनीसोबतची वागणूक संशयास्पद असल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षणाधिकारी यांचेकडे केली होती. परंतु त्याचेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे पालकवर्गात कमालीचा संताप निर्माण झाला होता, त्याचा उद्रेक गुरुवारी सकाळी झाला.

स्वतःला शिक्षण व्यवस्थेचा “मंडलिक” समजणाऱ्या त्या शिक्षकांबाबत अनेक तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. त्यांची विद्यार्थिनी बाबतची वागणूक संशयास्पद असताना लेकीबळीची बदनामी नको म्हणून कोणीही पुढे यायला धजावत नव्हते. यामुळे ग्रामस्थांत त्याचे बाबत रोष वाढतच गेला. घटनेच्या दिवशी शेकडो पालक शाळेत पोहचले. तो नालायक शिक्षक दिसताच त्यांचेवर ग्रामस्थ तुटून पडले. प्रकरणाचे गांभीर्य बघताच प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सूचित केले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, शिक्षकाला मारहाण केल्याची बाब लक्षात घेत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्याला का बदडले याची सखोल चौकशी करण्याचे सौजन्य पोलीस प्रशासन दाखवेल का? त्या शिक्षकाची शाळा व्यवस्थापन समितीने केलेल्या तक्रारीत “विध्यार्थीनीशी वागणूक संशयास्पद” या वाक्याचा अर्थ उलगडून त्यांचेवर काय कारवाई करणार ! असे अनेक प्रश्न अधांतरी असले तरी ठोस कार्यवाही अपेक्षित आहे.
तीन वर्षांपूर्वी याच शाळेत शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली होती. तत्कालीन मुख्याध्यापकाने विद्यार्थिनी सोबत अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. ते प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळेच पुन्हा तशीच पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पालकवर्गाने हे पाऊल उचलल्याचे बोलल्या जात आहे.
गुरुवारी घडलेल्या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवर्ग यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षकी पेशा हा समाजाचा आधारस्तंभ मानला जातो. मात्र काही व्यक्तींच्या अशा वर्तनामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद शिक्षण समितीनेही या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
Rokhthok News