Home Breaking News बापरे…नवजात बाळाला “चक्क” नालीत फेकले

बापरे…नवजात बाळाला “चक्क” नालीत फेकले

● ‘त्या’ मृत अर्भकाची होणार DNA चाचणी ● निर्दयी मातेविरुद्ध गुन्हा दाखल

C1 20250105 20341178
‘त्या’ मृत अर्भकाची होणार DNA चाचणी
निर्दयी मातेविरुद्ध गुन्हा दाखल

Sad News | “माता न तू वैरिणी”….अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या चिमुकलीला मातेनं फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार दारव्हा येथे उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना रविवार दिनांक 5 जानेवारीला समोर आल्याने समाजमन सुन्न झाले. ‘त्या’ मृत अर्भकाची DNA चाचणी करण्यात येणार असून निर्दयी माते विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. The newborn baby was thrown into the drain…

दारव्हा शहरातील अंबादेवी मंदिर मार्गावरील परिसरात एका नालीत स्त्री जातीचे अभ्रक मृतावस्थेत आढळून आले. ही वार्ता सर्वत्र पसरली आणि बघ्यांची गर्दी झाली. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सूचित केले. पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी थेट घटनास्थळ गाठले. पंचनामा करून नवजात शिशुचे शव दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात हलवले.

मृत अर्भक स्त्री जातीचे असून, अनैतिक संबंधातून जन्माला आले असावे अशी चर्चा रंगत आहे. दारव्हा पोलिसांनी या निर्दयी माते विरुद्ध गुन्हा दाखल केला अहे. दोषीवर कठोर करवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली असून त्या शिशुची DNA चाचणी करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.

Img 20250103 Wa0009

या प्रकरणाचा तपास पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, सहा. पोलीस अधिक्षक चिमुल्ला रजनिकांत यांच्या मार्गदर्शनाखाली दारव्हा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास कुळकर्णी, API दिनेश गावंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लावरे, पंकज राठोड, विलास राठोड, विजय फोफसे करीत आहे.
ROKHTHOK NEWS