Home Breaking News विद्यमान आमदारांच्या विकृत मानसिकतेचे दर्शन..!

विद्यमान आमदारांच्या विकृत मानसिकतेचे दर्शन..!

● माजी आमदारांचा घणाघाती आरोप ● फलकावर कोणाचे नाव टाकायचे हा पालिकेचा अधिकार..!

C1 20260417

माजी आमदारांचा घणाघाती आरोप
फलकावर कोणाचे नाव टाकायचे हा पालिकेचा अधिकार..!

Political News : नगर पालिकेच्या माध्यमातून आनंद नगर परिसरात उभारण्यात येत असलेल्या ‘नमो उद्यान’च्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला होता. तेथे लावण्यात आलेल्या फलकाचा वाद चांगलाच पेटला. शिवसैनिक व विद्यमान आमदार यांनी आक्रमक पवित्रा घेत लावलेला फलक तोडून आपल्या नावाचा फलक लावला. हा प्रकार विद्यमान आमदारांच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवत असल्याचा घणाघाती आरोप माजी आमदारांनी केला. A glimpse of the distorted mentality of the current MLAs..!

C1 20260417
पूर्वीचा फलक

नगर पालिकेच्या माध्यमातून आनंद नगर येथे ‘नमो उद्यान’ साकारण्यात येत आहे. भूमिपूजन सोहळ्याला कोणाला बोलवायचे, कोण अध्यक्ष व उद्घाटक असेल याचा सर्वस्वी अधिकार नगराध्यक्ष व स्वायत्त संस्था असलेल्या पालिकेचा आहे. शहरात पालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामात फलकाची तोडफोड करून अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला आहे.

IMG 20260511 WA0005
C1 20260417
नंतर लावण्यात आलेला फलक

वणी नगर पालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. शहराच्या शाश्वत विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. होत असलेल्या विकास कामात विरोधकांनी अडथळा निर्माण करू नये. फलकाची तोडफोड केल्याने विकासाची गती थांबणार नाही, असेही बोदकुरवार यांनी स्पष्ट केले.

Img 20250103 Wa0009
C1 20260417
तोडण्यात आलेला पूर्वीचा फलक

मी आमदार असताना गणेशपूर ग्रामपंचायतीला निधी दिला. तत्कालीन सरपंच शिवसेनेचा होता. राज्यात मविआ ची सत्ता होती व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असतांना विरोधी आमदार म्हणून मला बोलावले नव्हते. तसेच शहरातील सिमेंट रस्त्यासाठी गडकरी साहेबांकडे पाठपुरावा केला निधी खेचून आणला तेव्हा सुद्धा विरोधी आमदार म्हणून मला भूमिपूजनाला बोलावले नाही. मी तेव्हा कोणतेही फलक तोडले नाही किंवा विकृत मानसिकता बाळगत आक्रस्ताळेपणा केला नव्हता. विकास कामात अडथळा निर्माण होऊ नये हीच माझी भूमिका होती व राहणार.
संजीवरेड्डी बोदकुरवार
माजी आमदार, वणी विधानसभा
Rokhthok