Home क्राईम तेथील…..जंगी कोंबड बाजाराचा डाव पोलीसांनी ‘उधळला’

तेथील…..जंगी कोंबड बाजाराचा डाव पोलीसांनी ‘उधळला’

● 'टिप' वणी पोलीसांना, गुन्‍हा मारेगावात दाखल

2171
C1 20231014 18124874

‘टिप’ वणी पोलीसांना, गुन्‍हा मारेगावात दाखल

Crime News wani | कोंबड बाजार सुरु असल्‍याची गोपनिय माहिती वणी पोलीसांना मिळताच शुक्रवारी दुपारी घटनास्‍थळी धाव घेण्‍यात आली. पोलीसांची चाहुल लागताच जुगाऱ्यांनी पळ काढला माञ हदद मारेगांव पोलीस ठाण्‍याची असल्‍याने मारेगांव पोलीसांना पाचारण करण्‍यात आले. याप्रकरणी मारेगांव पोलीसात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. A case has been registered in Maregaon police in this regard.

Img 20250422 wa0027

उप विभागात आता कोंबड बाजाराचे लोन पसरत चालले आहे. जंगल सदृष्‍य भागात कोंबडयाच्‍या झुंजी लावून हारजित केल्‍या जात आहे. भांदेवाडा परिसरात पेट्रोलींग करत असलेल्‍या सपोनि माया चाटसे यांना कोंबड बाजार सुरु असल्‍याची टिप मिळाली. त्‍यांनी क्षणाचा विलंब न करता आपल्‍या सहकाऱ्यांसह घटनास्‍थळ गाठले.

Img 20250103 Wa0009

लखमापुर – नेत शिवारातील जंगलव्‍याप्‍त भागात कोंबड बाजार सुरु होता. कोबडयाच्‍या झुंजी लावून हारजित करण्‍यात येत असतांनाच पोलीसाचे वाहन पोहचताच पळापळ सुरु झाली. आपली वाहने सोडून अनेकांनी पळ काढला घटनास्‍थळी एकच कल्‍लोळ माजला. तरी पोलीसांनी काहींना ताब्‍यात घेतले. माञ ती हदद मारेगांव पोलीसांची येत असल्‍याने मारेगांव पोलीसांना पाचारण करण्‍यात आले.

जगदीश गुरुचरन पाटील (40) असे घटनास्‍थळी ताब्‍यात घेण्‍यात आलेल्‍या व्‍यक्‍तीचे नांव असुन तो राजुर कॉलरी येथील निवासी आहे. मारेगांव पोलीसांनी त्‍यांची अंगझडती घेतली असता त्‍याचे जवळून दोन हजार 600 रुपये मिळाले तर दोन कोंबडे आणि काती जप्‍त करण्‍यात आले आहे. या घटनेत केवळ तीन हजार 600 रुपयांचा मुददेमाल जप्‍त करण्‍यात आला असुन महाराष्‍ट्र जुगार कायदा 12 (ब) नुसार गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.
Rokhthok News