● भरदिवसा तरुणाच्या हत्येचा प्रयत्न
Crime News | शहरात रविवारी सकाळी घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे. दुसऱ्या शहरातील तरुण येतात आणि येथील 21 वर्षीय तरुणांच्या गळयावर धारदार शस्ञाने वार करत हत्येचा प्रयत्न करतात. या घटनेने संपुर्ण शहर हादरलेले असतांना पोलीस प्रशासन माञ हतबल दिसत आहे. आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी त्याने हे कृत्य का केले याचे कारण गुलदस्त्यात आहे. And he…cut his throat with a sharp knife

अजिंक्य संतोष चौधरी (23) असे आरोपीचे नाव आहे, तो हिंगणघाट येथील निवासी आहे तर त्याचे सोबत एक विधिसंघर्ष ग्रस्त बालक होता. घटनेच्या दिवशी प्रणय घरी एकटाच होता त्याची आई बाहेरगावी गेलेली होती. रविवारी सकाळी ते दोघे प्रणयच्या घरी आले क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि आरोपीने धारदार शस्त्राने प्रणयच्या गळ्यावर सपासप वार केले.
आरोपी अजिंक्य ने हत्येचा प्रयत्न का केला याचे कारण गुलदस्त्यात असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तपास युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र शहरात फोफावलेली गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. घडलेल्या घटनेने शहरात चांगलीच खळबळ माजली असली तरी पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शहरात अवैध व्यवसाय चांगलाच फुलला, फळला आणि बहरला आहे. आदर्श आचारसंहितेच्या काळात मटका, जुगार आणि अन्य अवैध व्यवसायाने कळस गाठला होता. संपुर्ण प्रशासन निवडणुक कार्यक्रमात मशगुल असतांना मटका व्यवसायीकांची माञ चांदी होती. थातुर मातुर कारवाया हे नित्याच्याच असल्या तरी ठोस कारवाई करतांना पोलीसांनी आखडता हात घेतल्याचे दिसुन आले. त्यातच आता हत्येचा प्रयत्न झाल्याने पोलीस प्रशासनाची कार्यप्रणाली उजागर होत आहे.
प्रणय मूने याचेवर करण्यात आलेला हल्ला नेमका का व कशासाठी हा तपासाचा भाग आहे. पोलीस तपासातुन सर्व निष्पन्न होणार आहे, माञ हत्येच्या उद्देशाने आलेले हल्लेखोर हे निष्णात असल्याचे बोलल्याजात आहे. म्हणजेच बाहेरगावचे गुन्हेगार वणी शहरात वावरत असल्याचे या घटनेने अधोरेखित होत आहे. पोलीसांचे डीबी पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि गोपनिय शाखा नेमकं काय करताहेत हे कळायला मार्ग नाही.
ROKHTHOK NEWS