Home क्राईम Crime…वणीत सापळा, एक अटकेत, सहा गुन्हे उघड

Crime…वणीत सापळा, एक अटकेत, सहा गुन्हे उघड

● LCB पथकाची धडाकेबाज कारवाई

3189

LCB पथकाची धडाकेबाज कारवाई

Crime News Wani | स्थानिक गुन्हे शाखा पथकाची तार व केबल चोरट्यावर करडी नजर होती. जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यात सहा गुन्हे नोंद करण्यात आले होते. चोरट्याचा छडा लावण्यासाठी LCB पथक सरसावले. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला आणि एकाला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता सहा गुन्ह्याची उकल करण्यात आली. या कारवाईत 7 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Six crimes were registered in five police stations of the district.

Img 20250422 wa0027

सैय्यद अब्दुल अली (44) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. तो येथील फुकटवाडी गुरु नगर, वणीतील निवासी असून हल्ली तो खान साहाब प्लॉट, खिडकीपुरा नेर येथे वास्तव्यास आहे. तार व केबल चोरीच्या घटनेत कमालीची वाढ झाली आहे. वणी, मारेगांव, शिरपुर, राळेगावं, वडगांव जंगल या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र चोरट्याचा छडा लागत नव्हता.

Img 20250103 Wa0009

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय महितगाराची यंत्रणा कार्यान्वित केली. एक इसम टाटा सुमो वाहनात चोरीचा अॅल्युमिनीयम तार घेवुन घोन्सा टी पॉईन्ट वरून वणी शहरात प्रवेश करणार असल्याची “टीप” मिळाली. LCB पथकाने दिनांक 20 सप्टेंबरला सापळा रचला आणि सावज गळाला लागला.

पोलिसांनी संशयित एका टाटा सुमो वाहनाला अडवले. चोरट्याला ताब्यात घेत वाहनांची तपासणी केली असता त्यात विद्युत वाहीनीचे तुकडे केलेले सहा बंडल तार, मोठे कटर, दोन ऑक्सीजन सिलेंडर व त्याचे उपयोगाकरीता लागणारे पाईप नोजल असा एकूण 1 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ताब्यातील चोरट्याला विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरची तार ही दोन दिवसांपुर्वी कायर परिसरातुन कटरचे सहाय्याने तोडली असल्याचे सांगितले. यावेळी त्याचे सोबत अनिल यमुलवार व दिनेश मेश्राम हे दोघे सहभागी असल्याचे स्पष्ट केले.

तार व केबल चोरी प्रकरणी पोलिसांनी विस्तृत विचारणा केली. तिघांनीच पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तपासाअंती अॅल्युमिनियम ताराचे तुकडे व एक बंडल, अखंड गोल गुडाळलेले अॅल्युमिनियम ताराचे 8 बंडल, तुकडे केलेले इलेक्ट्रिक. पोल चे 13 तुकडे, कॉपर केबल भरून असलेले तीन पोते किंमत 2 लाख 73 हजार रुपये व दोन वाहने असा एकूण 7 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, पोलीस निरीक्षक LCB आधासिंग सोनोने, सपोनि अतुल मोहनकर, अमोल मुडे, योगेश डगवार, सुनिल खंडागळे, भोजराज करपते, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सुधीर पांडे, सतीष फुके, नरेश राउत यांनी पार पाडली.
Rokhthok News