Home Breaking News Sad News : मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मातोश्रींचे निधन

Sad News : मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मातोश्रींचे निधन

● परिवारावर पसरली शोककळा

C1 20251016 13140531

परिवारावर पसरली शोककळा

Sad News :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजूभाऊ उंबरकर यांच्या मातोश्री सुनंदाबाई मधुकरराव उंबरकर यांचे दिनांक 16 ऑक्टोबर ला दुपारी 12 वाजता आकस्मित निधन झाले. मृत्यूसमयी त्या 85 वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाने उंबरकर परिवारावर शोककळा पसरली आहे. MNS leader Raju Umbarkar’s mother passes away

सुनंदाबाई ह्या हसतमुख स्वभावाच्या होत्या त्या सर्वश्रुत समाजसेवक व मनसे नेते राजूभाऊ उंबरकर यांच्या प्रेरणास्थान होत्या. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने उंबरकर कुटुंबावर तसेच वणीच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

स्वर्गीय सुनंदा मधुकरराव उंबरकर यांच्या पश्चात दोन मुले आणि दोन मुली असा मोठा आप्त परिवार आहे. मोठे पुत्र प्रवीण उंबरकर हे शासकीय कंत्राटदार आहेत तर लहान राजू उंबरकर हे मनसेचे निष्ठावान आणि नावलौकिक नेते म्हणून ओळख प्राप्त आहे. याशिवाय दोन मुली व त्यांना नातवंड आणि मोठा आप्त परिवार आहे. वणीच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात उंबरकर कुटुंबाचे मोठे योगदान आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)

Img 20250103 Wa0009