Home क्राईम महिलेवर सामूहिक अत्याचार, चौघे नराधम अटकेत

महिलेवर सामूहिक अत्याचार, चौघे नराधम अटकेत

● आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हे नोंद

2599

● आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हे नोंद

Crime News Wani| राजूर कॉलरी येथे वास्तव्यास असलेल्या 50 वर्षीय महिलेवर चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री नवरगाव शेतशिवारात ही घडली. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. A 50-year-old woman residing at Rajur colliery was gang-raped by four assailants.

Img 20250422 wa0027

विठ्ठल ज्ञानेश्वर डाखरे (39) टागोर चौक, कपिल व्यंकटेश अंबलवार (35) जैताई नगर, मनोज अजाबराव गाडगे (47) रामपुरा वार्ड, वैभव घनश्याम गेडाम (22) रा. आटीआय जवळ लालगुडा असे वासनांध नराधमांचे नावे आहेत.

Img 20250103 Wa0009

पीडित महिला आपल्या मुलासह राजूर कॉलरी येथे वास्तव्यास असून मोलमजुरी चे काम करते. आरोपीतील एकाचे पैसे पीडितेच्या मुलाकडे होते. पैसे मागण्यासाठी चौघे दोन दुचाकीने राजूरला पोहचले. पीडितेला तिच्या मुलांबाबत विचारणा केली, तो घरी नसल्याचे सांगताच त्याला शोधायला चाल म्हणत ऑटो ने तिला वणीत आणले.

आरोपीने एक कार भाडेतत्त्वावर घेतली आणि त्यात पीडितेला बसवले आणि मुलाला शोधण्यासाठी निघाले. वाटेतच एका बार मध्ये चौघांनी मद्यपान केले व थोडीशी दारू पाण्याच्या बॉटल मध्ये आणून पीडितेला पाजण्याचा प्रयत्न केला. वाहन मरेगावच्या दिशेने धावत असताना आरोपीने वाहन नवरगाव कडे वळवले. त्या परिसरातील एका शेतात पीडितेला नेताच वासनांध नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.

पाशवी अत्याचाराला अंजाम दिल्यानंतर आरोपीने पीडितेला रात्री राजूरला सोडून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेने थेट वणी पोलीस ठाणे गाठून घडलेली आपबीती कथन केली. ठाणेदार अजित जाधव यांनी घटनेचे गांभिर्य बघता तात्काळ गुन्हा नोंद केला आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
Rokhthok News