Home क्राईम त्याने चक्क… एकाच्या पोटात सुरा खुपसला..!

त्याने चक्क… एकाच्या पोटात सुरा खुपसला..!

● पूर्वाश्रमीच्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात..

C1 20261023

● पूर्वाश्रमीच्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात..

CRIME NEWS :
He actually… stabbed someone in the stomach..! तालुक्यातील मांगरूळ येथे पूर्वाश्रमीच्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. या घटनेत संशयित आरोपी मोहन बापूराव मसगवळी (50) याने कृष्णा भोयर (29) याच्या पोटावर कोंबडी कापण्याच्या सुर्‍याने वार केल्याची घटना घडली. यावेळी झालेल्या मारहाणीत दोघेही जखमी झाले असून, मोहन याच्यावर नागपूर येथे, तर कृष्णा याच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, कृष्णा भोयर हा मांगरूळ येथील रहिवासी असून, बुधवारी सायंकाळच्या सुमारास तो आपल्या दोन मित्रांसह मारेगाव येथील भारतीय स्टेट बँकेसमोर उभा होता. यावेळी वरुड येथील रहिवासी व सध्या मांगरूळ येथे वास्तव्यास असलेल्या मोहन मसगवळी याच्यासोबत तिघांपैकी एका मित्राचा वाद झाला. काही वेळात हा वाद शमल्यानंतर संबंधित व्यक्ती मांगरूळ येथे रवाना झाल्या.

दरम्यान, सुमारे तासाभरानंतर मांगरूळ येथे धक्का लागल्याच्या कारणावरून पुन्हा वाद उफाळला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संशयित मोहन मसगवळी याने कोंबडी कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुर्‍याने कृष्णा भोयर याच्या पोटावर वार केला. यात कृष्णा गंभीर जखमी झाला. दुसरीकडे, झालेल्या मारहाणीत मोहन मसगवळी हाही जखमी झाला.

Img 20250103 Wa0009

दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अनुक्रमे नागपूर आणि चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत. या वादामागे पूर्ववैमनस्याची किनार असल्याचीही चर्चा आहे, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून, संशयित आरोपी मोहन मसगवळी याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 118(1) नुसार गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. ठाणेदार सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Rokhthok