Home क्राईम सराईत ‘आशिक’ तडीपार तर ‘सलमान खान’ अटकेत

सराईत ‘आशिक’ तडीपार तर ‘सलमान खान’ अटकेत

● तांत्रिक कौशल्याचा आधार घेत शिरपूर पोलिसांची दुहेरी कारवाई.....

C1 20261019

● तांत्रिक कौशल्याचा आधार घेत शिरपूर पोलिसांची दुहेरी कारवाई…..

CRIME NEWS :
‘Aashiq’ in Sarai exiled, ‘Salman Khan’ arrested आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शिरपूर पोलिसांनी दोन महत्त्वपूर्ण कारवाया केल्या आहेत. विविध गुन्ह्यातील सराईत आरोपी ‘आशिक’ ला तडीपार करण्यात आले तर दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांना गुंगारा देत असलेल्या ‘सलमान’ला उत्तरप्रदेशातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी आणि अवैध दारू विक्रीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेला शेख आशिक उर्फ तोत्या शेख इब्राहीम (35) हा कुरई येथील निवासी असून पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. आगामी सण-उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने त्याच्याविरुद्ध वणी व मारेगाव तालुक्यांतून तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली.

दुसऱ्या कारवाईत शिरपूर पोलीस ठाण्यात सन 2013 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी सलमान खान समशाद खान पठाण (35) हा उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी असून निलजई येथील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) परिसरात सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून हा आरोपी तब्बल 13 वर्षे फरार होता.

Img 20250103 Wa0009

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या फरार आरोपी शोधमोहिमेंतर्गत पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून तसेच पोस्टल विभागाची मदत घेऊन आरोपीचा माग काढला. त्यानंतर उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील सैनी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार संतोष मनवर, पोलीस उपनिरीक्षक गुल्हाणे, पोलीस हवालदार सुनील दुबे, अजय वाभिटकर, पोलीस शिपाई किरण दासरवार, पोलीस कॉन्स्टेबल पंकज कुडमेथे आणि होमगार्ड मोहन घागी यांनी केली.
ROKHTHOK

Previous articleरोखठोक, सेवाव्रती दीपस्तंभ, ऍड. देविदास काळे
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.