● संघर्षातुन पुढे आलेले व्यक्तीमत्व तर चळवळीतुन पुढे आलेले नेतृत्व…..
Rokhthok :
Rokhthok, Sevavrathi Deepstambh, Adv. Devidas Kale… वैयक्तिक प्रगती ही केवळ आपल्यापुरतीच मर्यादीत असते. मात्र, आपल्यासोबत आपल्या समाजातील, परिसरातील लोकांचे जीवनमान उंचावले तर ती प्रगती नक्कीच आदर्श ठरत असते. त्यामुळे समाजकारण, राजकारण, सहकार आणि बँकिंगच्या माध्यमातून वंचित, शोषित, दुर्बल घटकांची प्रगती साधण्यासाठी अपार कष्ट सोसणारे सेवाव्रती दीपस्तंभ ऍड. देविदास काळे यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे.
ऍड. देविदास काळे हे संघर्षातुन पुढे आलेले व्यक्तीमत्व तर चळवळीतुन पुढे आलेले नेतृत्व आहे. विद्यार्थीदशेपासूनच ते विविध चळवळी, आंदोलनांच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय राहिले आहेत. ऍड. देविदास काळे यांना सहकार क्षेत्राविषयी पूर्वीपासूनच आत्मियता आहे. सहकारातून जनसामान्यांच्या आयुष्यात समृद्धी आणता येते, या तत्वज्ञानावर त्यांचा विश्वास आहे. म्हणूनच ते सहकार क्षेत्रात पूर्वीपासून कार्यरत आहेत.
तब्बल 25 वर्षांपासून विदर्भातील अग्रेसर असलेल्या श्री. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वात या पतसंस्थेने मोठी भरारी घेतली आहे. अघ्यक्ष, संचालक यांनी घेतलेले अफाट परिश्रम सर्वार्थाने कारणीभुत असले तरी सभासदांचा विश्वास हेच विकासाचे प्रतिक असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.
शुन्यातून सुरुवात झालेल्या या पतसंस्थेचे सध्या 80 हजाराच्या वर सभासद आहेत. सहकारातून जनसामान्यांच्या आयुष्यात समृद्धी आणता येते, या तत्वज्ञानावर श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचा विश्वास असून तळागाळातील गरजूंना विविध गरजांसाठी कर्ज उपलब्ध करून देत त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी ही पतसंस्था ऍड. देविदास काळे यांच्या अध्यक्षतेखाली वाटचाल करत आहेत. आज त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे.
( ऍड. देविदास काळे यांना “रोखठोक” परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा )






