
● 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
● LCB पथकाची कारवाई
Crime News : वणी येथील जत्रा मैदान परिसरात एमडी (Mephadrone) या अंमली पदार्थाची विक्री करताना एका युवकाला LCB पथकाने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता 2.280 ग्रॅम एमडी पावडर मिळाले. या प्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून 86 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. MD Drugs: Intrusion into the city, a case has been registered against three people

क्षितीज अशोक इंगळे (23) रा. रंगनाथ नगर, अंकित कडू (24) व प्रतिक (पूर्ण नाव माहीत नाही) (27) हे दोघे रा. नागपूर या तिघांविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा NDPS Act 1985 अंतर्गत कलम 8(क), 21(अ) आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून जत्रा मैदान परिसरात क्षितीज इंगळे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या पॅंटच्या मागील खिशात ठेवलेल्या पांढऱ्या रुमालात लपवलेली एक पन्नी आढळली. या पन्नीमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर होती, जी त्याने एमडी ड्रग MD Drugs असल्याचे कबूल केले.
प्राथमिक चौकशीत क्षितीज इंगळे याने सांगितले की, सदर MD Drugs पावडर नागपूर येथील प्रतिक (पूर्ण नाव माहीत नाही) या इसमाकडून अंकित कडूच्या मध्यस्थीने विकत घेतली आहे. तो एमडी पावडर प्रतिग्राम ₹5,000 या दराने विकत घेत असल्याचेही त्याने सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी एक मोबाईल, लाल रंगाची पल्सर NS200 मोटारसायकल (MH 34 BK 1843) व 2.280 ग्रॅम एमडी पावडर असा एकूण 86 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरात MD Drugs चा शिरकाव झाल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले असून तरुणाईला नशेच्या गर्तेत अडकविण्याचे षडयंत्र तस्कर करताहेत का ? हे तपासणे गरजेचे झाले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, LCB स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे, ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI धनराज हाके, उल्हास कुरकुटे, सुनील खंडागळे, निलेश निमकर, सुधीर पिदूरकर, सुधीर पांडे, रजनीकांत मडावी, सलमान शेख यांनी केली.
Rokhthok News