● दोन दिवसांत दुसरी हत्या
● कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
Crime News :
शहरालगत गणेशपुर येथे क्षुल्लक वादातून झालेल्या खुनाने परिसर हादरला आहे. बुधवार 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता गणेशपूर स्मशानभूमी परिसरात जुगार खेळताना झालेल्या भांडणाचे पर्यवसान खुनात झाले. पोळा सणाच्या बडगा निमित्ताने जुगाराला चांगलेच उधाण येणार आहे. पोलीस प्रशासनाला सतर्क राहावे लागणार असून मागील काही काळापासून पोलिसिंग संपुष्टात आल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. Two consecutive murders in two days
संजय प्रभाकर कावरे (42, रा. गणेशपुर) हा युवक जागीच ठार झाला. आरोपी संदीप सूर्यभान इसापुरे (40, रा. गणेशपुर) याने दगड उचलून संजयच्या डोक्यावर प्राणघातक वार केला. संजय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस ताब्यात घेतले. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
यापूर्वी दोन दिवसांपूर्वीच वणी पोलिस स्टेशन हद्दीतील मंदर गाव शिवारात एका 60 वर्षीय वृद्धाची अज्ञात मारेकऱ्याने हत्या केली होती. अवघ्या दोन दिवसांत सलग दोन खुनांच्या घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ROKHTHOK






