Home राजकीय कडवट शिवसैनिक सुधीर थेरे रिंगणात

कडवट शिवसैनिक सुधीर थेरे रिंगणात

● प्रभाग 8-ब मध्ये ‘धडाकेबाज’ लढत!

C1 20251126

प्रभाग 8-ब मध्ये ‘धडाकेबाज’ लढत!

Political News :
नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8-ब मध्ये कडवट, हुशार आणि लढवय्या शिवसैनिक अशी ओळख असलेले सुधीर रिमदेव थेरे यंदा महाविकास आघाडी (शिवसेना उबाठा) कडून दमदारपणे रिंगणात उतरले आहेत. अडी-अडचणीत लोकांसोबत खंबीरपणे उभा राहणारा, सिस्टिमसमोर न घाबरता रस्त्यावर उतरून आवाज बुलंद करणारा कार्यकर्ता अशी त्यांची छाप मतदारांच्या मनावर ठसलेली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रभागात निवडणुकीची रंगत वाढली आहे. Bitter Shiv Sainik Sudhir There in the fray

पंचवीस वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असणारे थेरे हे शिवसेना (उबाठा) चे जिल्हा समन्वयक आहेत. शेतकरी, सर्वसामान्य, वंचितांच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली… मोर्चे काढले… अंगावर गुन्हे घेतले, जेलची हवा खाल्ली; पण लोकांचे प्रश्न मांडणे थांबवले नाही! अशी त्यांची प्रतिमा आजही आहे.

सुधीर थेरे यांच्या पत्नी अर्चना थेरे या नगरसेविका व नगराध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळल्या कर्तबगार महिला आहेत. तसेच थेरे यांचा प्रशासनावरही चांगला प्रभाव असून प्रभागातील विकासाचे वास्तव चित्र त्यांना तोंडपाठ आहे.

Img 20250103 Wa0009

गुरुनगर, विराणी टॉकीज परिसर, कन्नमवार चौक, बेलदारपुरा, तलाव रोड, मोमिनपुरा (काही भाग), इंदिरा चौक या भागांचा समावेश असलेल्या प्रभागात आ. संजय देरकर व जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्त्वात थेरे यांचा प्रचार जोरात सुरू असून काँग्रेस व मनसे कार्यकर्त्यांचीही ठोस साथ मिळत आहे.
Rokhthok