●स्थानिक राजकारणात भाजपचाच बोलबाला
POLITICAL NEWS :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विदर्भ दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. बुधवार दिनांक 26 नोव्हेंबरला वणी येथे होणारी त्यांची सभा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. या सभेत शिंदे हे महायुतीतील सहयोगी पक्ष भाजपावर आसूड ओढतात की, शिवसेना उबाठा वर शाब्दिक “बाण” सोडतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. BJP or UBT : Who will Deputy Chief Minister Eknath Shinde target?
राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, शिंदे यांनी सातत्याने स्वतःच्या गटातील उमेदवारांना प्राधान्य दिल्यामुळे महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वणीतील सभेनंतर या तणावात अधिक वाढ होण्याची चिन्हे दिसत आहे. भाजप उमेदवारांविरोधातील प्रचारामुळे राज्याच्या राजकारणातील महायुतीत कटुता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवार निवड आणि जागावाटपावरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू आहेत. अनेक नगर परिषदांमध्ये दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने परिस्थिती आणखी गोंधळलेली आहे. राज्यात सोबत तर स्थानिक पातळीवर विरोध हे मतदारांना पचनी पडणारे नाही.
वणीतील सभेकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागलेले असले तरी पालिकेच्या राजकारणात भाजपचा वरचष्मा राहिलेला आहे. मागील रेझिम मध्ये अन्य राजकीय पक्षाला खाते सुद्धा उघडता आले नव्हते तीच परिस्थिती यावेळी आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रचारसभेमुळे वातावरण निर्मिती होणार असली तरी मतविभाजन होईल असे दिसत नाही.
ROKHTHOK






