Home राजकीय खरंच, काँग्रेसचा “गेमप्लॅन” अंगलट..!

खरंच, काँग्रेसचा “गेमप्लॅन” अंगलट..!

● प्रभाग 14 मध्ये आघाडी आमनेसामने

C1 20251123

प्रभाग 14 मध्ये आघाडी आमनेसामने

Political News :
वणी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना(उबाठा) व काँग्रेस आघाडीतील कलह चव्हाट्यावर आल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. काँग्रेस पक्षाने उमेदवारी वाटपात निष्ठावंतांना डावलत घटक पक्षांना प्राधान्य दिल्याची चर्चा जोर धरत असून, स्वतःच्या पक्षचिन्हाला विस्मृतीत ढकलण्याचे कारस्थान तर रचले नाही ना? असा सवाल कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे. Indeed, Congress’ “gameplan” has been turned upside down..!

विशेष म्हणजे, प्रभाग 14 मध्ये आघाडीतील दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ‘पॉलिटिकल तिढा’ निर्माण झाला आहे. यामुळे आघाडीत अंतर्गत नाराजी शिगेला पोहोचली असून याचा परिणाम थेट मतदानावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आघाडीत तणाव वाढला असून स्थानीक पक्षश्रेष्ठींनी घटक पक्षाला झुकते माप दिल्याने एकनिष्ठ कार्यकर्ते दुखावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आघाडीने ऐन निवडणुकीत घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना डावलले. परिणामी त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. नगराध्यक्ष पदाकरिता दमदार उमेदवार उतरवल्याने आघाडीसमोर मोठे संकट उभे राहिले राहिले आहे.

Img 20250103 Wa0009

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस आघाडी अस्तित्वात असताना दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार निवडणूक रणसंग्रामात आमनेसामने उतरवणे कार्यकर्त्यांना डीवचनारे आहे. याचा परिणाम आघाडीत बिघाडी होऊन संपूर्ण निवडणुकीला वेगळे वळण देणारे तर ठरणार नाही ना हे बघणे औत्सुक्याचे असेल.

पालिकेच्या प्रभाग 14 अ मध्ये शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस पक्षाची आघाडी असताना दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवल्याने कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली आहे. काँग्रेस पक्षाने आशाताई पांडुरंग टोंगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यातच शिवसेना (उबाठा) पक्षाने माधुरी महेश साळुंके यांनी उमेदवारी दिली आहे. अंतर्गत समनव्य नसल्याने याचा परिणाम अन्य प्रभागात होणार असल्याचे संकेत मिळत आहे.
ROKHTHOK