Home राजकीय लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात

लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात

● भिम टायगर सेनेचा निवेदनातून इशारा

C1 20250715 20110052

भिम टायगर सेनेचा निवेदनातून इशारा

Wani News :
भिम टायगर सेनेने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना सडेतोड इशारा देणारे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत पाठवले. यात लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे स्पष्ट करत जन सुरक्षा विधेयक 2025 रद्द करण्याची जोरदार मागणी केली. तसेच अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. Direct attack on democracy and freedom of expression, Bhim Tiger Sena warns in statement

बहुमताच्या जोरावर लादलेला जन सुरक्षा कायदा म्हणजे लोकशाहीची गळचेपी आहे. या कायद्यातून आंदोलक, विचारवंत व सामाजिक नेतृत्वांचा आवाज दाबण्याचा सरकारचा कट असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणाऱ्या या कायद्याचा वापर सरकार आपल्या विरोधकांना गप्प करण्यासाठी करणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अतिरेकी पद्धतीने शाई फेक व हिंसक हल्ला केल्याने राज्यात सामाजिक तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. हा प्रकार केवळ व्यक्तिवर नव्हे तर विचारधारेवर हल्ला असल्याचे भिम टायगर सेनेने स्पष्ट केले आहे.

Img 20250103 Wa0009

भिम टायगर सेनेने निवेदनातून प्रमुख मागण्या रेटून धरल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने हल्लेखोरांवर IPC व UAPA अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, हल्ला करणाऱ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेमार्फत चौकशी करावी, प्रवीणदादा गायकवाड यांना शासनस्तरीय सुरक्षा कवच द्यावे, राज्यात सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घ्यावी व जन सुरक्षा विधेयक तात्काळ मागे घ्यावे असे नमूद करण्यात आले आहे.

हा हल्ला म्हणजे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात आहे. जर सरकारने तत्काळ कारवाई केली नाही, तर राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. राज्यपालांनी या कायद्यावर सही न करता जनतेच्या हक्कांचे रक्षण करावे, अशीही ठाम मागणी भिम टायगर सेनेने केली आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष योगेश रायपुरे, वणी विभाग अध्यक्ष राजू घायवन सह कार्यकर्ते उपस्थित होते.
Rokhthok News