● मतदारराजा उत्साहित, उत्स्फूर्त प्रतिसाद
● नगराध्यक्ष पदाच्या विद्या आत्राम व रेखा कोवे आणि लवलेश लाल या उमेदवारांना मतदारांची पसंती
Political News :
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात भाजपने प्रभागनिहाय “जनसंवाद” यात्रा आरंभली आहे. ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. जैन लेआऊट नंतर प्रभाग 11 मध्ये माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या दौऱ्यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम व नगरसेवक पदाचे उमेदवार रेखा विलासराव कोवे, लवलेश किसनलाल लाल यांच्या प्रचारार्थ प्रभाग अक्षरशः पिंजून काढण्यात आला. Voters prefer Vidya Atram for the post of Mayor
भाजपने आखलेली रणनीती आणि नियोजनबद्ध वाटचाल मतदारांना आकर्षित करताहेत. शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी माजी आमदार बोदकुरवार, शहर अध्यक्ष ऍड. निलेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे, हितेश अटारा, शहर उपाध्यक्ष मनोज सरमोकदम, सत्यजीत ठाकूरवार तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते दिलेली प्रभागनिहाय जबाबदारी पार पाडताहेत.
शहर विकासाचा अजेंडा घेऊन भाजप निवडणूक रणसंग्रामात ताकदीने उतरली आहे. प्रत्येक प्रभागात बूथ लेव्हल पर्यंत कार्यकर्त्यांची फळी तैनात करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम यांना लाडक्या बहिणींचा चांगलाच पाठिंबा मिळताना दिसतेय. प्रभाग निहाय उमद्या उमेदवारांची केलेली निवड भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे.
प्रभाग 11 मध्ये महाराष्ट्र बँक चौक, टागोर चौक, सर्वोदय चौक, 8 नंबर शाळा, सेवा नगरचा काही भाग ते निर्गुडा नदी पर्यंत, रंगारीपुरा, गौरकार चौक, शिवनेरी चौक, गणेशपूर रोड इत्यादी परिसरांचा समावेश होतो. विविध जातीधर्माचे मतदार या प्रभागात आहेत.
“प्रभाग 11 नेहमीच भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. या निवडणुकीतही मतदार राजा दणदणीत साथ देतील, असा पूर्ण विश्वास आहे. जुन्या पाईपलाईनमुळे काही भागात उद्भवणारी पाण्याची समस्या तातडीने मार्गी लावू. स्वच्छता व नागरिकांच्या दैनंदिन तक्रारींचे निराकरण हा आमच्या उमेदवारांचा कटाक्ष राहील.” असा विश्वास माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केला.
ROKHTHOK






