Home वणी परिसर रक्षाबंधनातून स्नेहबंध, संघटनात्मक एकजुटीला नवी ऊर्जा !

रक्षाबंधनातून स्नेहबंध, संघटनात्मक एकजुटीला नवी ऊर्जा !

● बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त शिवसेना उबाठाचा स्तुत्य उपक्रम, समाजसेवेचा व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा संकल्प

C1 20260830
Screenshot 2026 08 27 16 21 33 25 99c04817c0de5652397fc8b56c3b3817

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त शिवसेना उबाठाचा स्तुत्य उपक्रम, समाजसेवेचा व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा संकल्प

Wani News :
New energy for organizational unity ! वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत राखी पौर्णिमेनिमित्त वणी येथे रक्षाबंधनाच्या स्नेहबंधातून संघटनात्मक एकजूट आणि समाजसेवेचा संदेश देण्यात आला. वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांच्या पत्नी तथा सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष किरण देरकर यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांना राखी बांधून भेटवस्तू देण्यात आल्या.

या उपक्रमामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आपुलकी, विश्वास आणि कौटुंबिक स्नेहाचे वातावरण निर्माण झाले. रक्षाबंधनाचा धागा केवळ नात्यांना जोडणारा नसून सामाजिक बांधिलकी आणि परस्पर जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

Img 20250103 Wa0009

“रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून विश्वास, संरक्षण, जबाबदारी आणि आपुलकीचा स्नेहबंध दृढ करणारा दिवस आहे. पक्षातील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा आपल्या कुटुंबाचा घटक आहे. हीच आपुलकी समाजापर्यंत पोहोचवून प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.”
किरण संजय देरकर,
स्त्री शक्ती फाउंडेशन, वणी

पक्षाचे संघटन केवळ राजकीय कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे गरजेचे आहे. आपल्या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, गरजू नागरिकांना मदत, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, स्वच्छता अभियान, रोजगार व मार्गदर्शन शिबिरे यांसह विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम नियमितपणे राबविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

“नागरिकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागात समाजोपयोगी कामातून स्वतंत्र ओळख निर्माण करावी,” असेही किरण देरकर यांनी स्पष्ट केले.

रक्षाबंधनाच्या स्नेहबंधाचा धागा संघटनात्मक एकजुटीशी जोडत बूथपासून गावपातळीपर्यंत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संदेश आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याची भूमिका तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी शिवसेना उबाठाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय देरकर यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. सण-उत्सवातून केवळ आनंद न घेता समाजाशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

महिला पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

या सोहळ्यास महिला जिल्हाप्रमुख डिमन टोंगे, ज्येष्ठ नेत्या तथा माजी जिल्हाप्रमुख व सरपंच गीता उपरे, महिला तालुकाप्रमुख सुरेखा ढेंगळे, महिला तालुकाप्रमुख मारेगाव इंदू किन्हेकार, महिला तालुका सचिव पौर्णिमा राजुरकर, तालुका संपर्कप्रमुख झरी ममता पारखी, पंचायत समिती सर्कल प्रमुख छबु आसूटकर, अमीना पठाण, महिला शहरप्रमुख सविता गुलाबराव आवारी, माजी पंचायत समिती सदस्य चंदा मुन, माजी नगरसेविका कीर्ती देशकर, नगरसेविका वर्षा किंगरे, नगरसेविका कांचन देरकर, प्रणाली देवाळकर, ग्रामपंचायत सदस्य वैशाली देठे, माजी नगरसेविका जिजा वरारकर, सामाजिक कार्यकर्त्या वेणू झोडे, मंजू इनामे, वर्षा पोटे यांच्यासह शिवसेना उबाठाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हाप्रमुख संजय निखाडे, युवासेना जिल्हाप्रमुख समीर लेनगुळे, गटनेते सुधीर थेरे, विधानसभा प्रमुख सुनील कातकडे, तालुका प्रमुख संतोष कुचणकर, तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुट्टे, नगरसेवक अजय धोबे, नगरसेवक शत्रुघ्न मालेकर, नेताजी पारखी, देवा बोबडे, विजय ताजने, गुलाब आवारी, आत्मा समिती अध्यक्ष तात्याजी पावडे तसेच नगरसेवक गुलाम रंगरेज यांनी मनोगत व्यक्त केले.